जिल्हा बदली 27/02/2017च्या तरतुदी

जिल्हा बदली 27/02/2017च्या तरतुदी

दि.27/02/2017 च्या शिक्षक जिल्हान्तर्गत बदली GR मधील प्रमुख तरतुदी...............

आधी GR वाचा.

1)सेवा ज्येष्ठता यादीत आपल्या खालीअसणाऱ्या शिक्षकांच्या शाळा आपण पसंतीच्या 20
 शाळा म्हणून टाकू शकतो.
व या वर्षी 100% विनंती बदली करु शकतो.
जिल्ह्यात कोठेही..

2) आपल्या शाळेवरील आपली जागा जर आपल्या पेक्षा ज्येष्ठ शिक्षकाने घेतल्यास आपली प्रशासकीय बदली होईल.

3)प्रशासकीय बदली ती ही पसंतीच्या 20 शाळा देऊनच

4)सेवा ज्येष्ठता यादीत आपल्या खालीअसणाऱ्या शिक्षकांच्या शाळा आपण पसंतीच्या 20
 शाळा म्हणून टाकू शकतो.

5)टप्पा क्र1,2, 3 व 4  या मध्ये बदली होणाऱ्या विशेष शिक्षकांना त्यांच्या पेक्षा जेष्ठ शिक्षकांच्या जागाही बदली ने घेता येऊ शकतात.

6) बदल्यांसाठीच्या टक्केवारी चे कोणतेही बंधन नाही.
बदलीपात्र शिक्षकांच्या कितीही बदल्या होऊ शकतात.अगदी हजारातही.

7)सामान्य बदलीपात्र शिक्षकाला टप्पा क्र 5 मध्ये बदली साठी त्याच्या पेक्षा कमी सेवाजेष्ठता असलेल्या शिक्षकांच्या शाळेचाच पसंतिक्रम द्यावा लागेल.

8)सेवाजेष्ठता यादीप्रमाणे बदलीसाठी आपला नंबर येईपर्यन्त जर आपली शाळा कोणीही बदलीसाठी मागितली नाही. तर आपण बदली साठी नकार देऊ शकतो.
मात्र आपल्यापेक्षा सेवाजेष्ठ शिक्षकांनी आपल्या शाळेवरील आपली जागा घेतल्यास आपली प्रशासकीय कारणास्तव बदली होणारच/ करावी लागणार.
9) विनंती बदली व प्रशासकीय बदली यांचा सुंदर मिलाप साधलेला 27 फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णय भविष्यात कायम राहिल्यास
आपल्या मनपसंत शाळेची निवड करणे व याच वर्षी मे महिन्यात बदली करुण घेणे फायद्याचे ठरेल.
पुढील 10 वर्षात पसंतीनुसार शाळा निवडण्याचे पर्याय कमी असतील.
10)बदली अधिकार प्राप्त शिक्षक हा बदली पात्र असेलच असे नाही म्हणून त्याने विवरण पत्र भरून देणे बंधनकारक आहे .अन्यथा अधिकार प्राप्त असूनही बदली होणार नाही.

11) सर्व बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांच्या जागा  बदली हवी असलेल्या शिक्षकांसाठी खुल्या आहेत.मेमो चालू असताना
नकार देणाऱ्या शिक्षकांच्या जागा मात्र त्यापुढील शिक्षकांना घेता येणार नाही.

12) बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना  फक्त सोप्या क्षेत्रातीलच जागेवर बदली मागता येईल.त्यांना अवघड क्षेत्रातुन पुन्हा अवघड क्षेत्रात बदली दिली जाणार नाही.


आता विवरण पत्राविषयी........

1)विवरण पत्र क्र1------ मधील चौकटीत ✔खूण केल्यास तुमची विनंती बदली होणार नाही.परंतु तुमच्या पेक्षा सेवाजेष्ठ शिक्षकांनी तुमच्या शाळेवरील तुमची जागा घेतल्यास तुमची प्रशासकीय बदली होईल.त्यासाठी मेमो ला हजर रहावे लागेल.

2)विवरण पत्र क्र 2-----अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकाला बदली नको असल्यास त्यांनी हे विवरण पत्र भरून देऊ नये. भरून दिल्यास तुम्हाला टप्पा क्र 4 मध्ये प्राधान्याने फक्त सोप्या क्षेत्रातीलच शाळा विनंतीने घेता येईल.पुन्हा अवघड क्षेत्रातील शाळा मिळणार नाही.बदली अधिकार प्राप्त आहे व बदली पात्र ही आहे त्यांनी विवरण पत्र 1 ही भरून द्यावे लागेल.तसेच जर आपण बदली अधिकार प्राप्त नसताल व बदली पात्र असताल तरीही विवरण पत्र 1 भरून देणे बंधनकारक आहे.


3) विवरण पत्र क्र3------ विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मधील शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी चौकटीत✔खूण करावी.खूण केल्यास मेमोला हजर राहण्याची गरज नाही.

4) विवरण पत्र क्र4---पतिपत्नी पैकी जो बदली पात्र असेल व त्या दोघांचे सध्या च्या शाळेचे अंतर 30 km पेक्षा जास्त असेल तरच हे विवरण पत्र भरता येईल.
दोघेही बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त नसल्यास बदली होणार नाही.






 विवरण पत्रे
क्र1--- बदली पात्र शिक्षकांनी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी भरून देणे बंधनकारक.

क्र 2--- बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी भरून द्यावीत.
बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र नसतील व त्यांना बदली करायची नसल्यास त्यांनी भरून देऊ नये.

क्र 3---- विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांनी भरून द्यावीत.

क्र 4 -- पतिपत्नी यांनी त्यांच्या शाळेतील सध्याचे अंतर 30 km पेक्षा जास्त आहे त्यांनीच भरून द्यावीत.

13)------व्याख्या क्र 4 व विवरण पत्र क्र 1 याचा मेळ बसत नाही.
विवरण पत्र क्र 2 मध्ये असलेला शाळांची यादी लिहायचा तक्ता  विवरण पत्र क्र 1 मध्ये दिला नाही.
म्हणजे  जिल्ह्यात हजर दिनांकनुसार 10 वर्ष पूर्ण झाल्यास  सोप्या क्षेत्रातील शिक्षकबदली पात्र होईल.
शाळा अवघड क्षेत्रात असेल तर 3 वर्ष सलग सेवा
सोपे 10 वर्ष
म्हणजे जिल्हा हजर दिनांक 31 मे 2007 पुर्विचा पाहिजे

14)  प्रशासकीय बदली म्हणजे विनंती बदली अनिवार्य ,तुम्ही नकार देऊ शकत नाही.
तेव्हा अर्जात सेवा ज्येष्ठता यादीत आपल्या खाली असणाऱ्या बदली पात्र शिक्षकांच्या शाळा टाका.किंवा तुमचा नंबर च्या क्षणी खुल्या असणाऱ्या शाळा घ्या.
पेसात होणारी प्रशासकीय बदली मात्र आपली पसंती विचारात घेतली जात नाही.
15) अवघड व् सोपे क्षेत्र यादी CEO साहेब या महिन्यात घोषित करणार आहेत.म्हणजे आज पर्यंत पेसा भाग सोडला तर सर्व जिल्हा क्षेत्र हे सोपेच होते.त्यामुळे विवरण 2 मध्ये दिलेला मागील शाळेचा तक्ता विवरण 1 मध्ये दिला नाही.
             त्यामुळे जिल्हा हजर दिनांकनुसार 10 वर्ष पूर्ण झाली असल्यास आपण बदली पात्र आहात.
        मात्र एखाद्याने त्यातील 8 वर्ष पेसात गेली व 2 वर्षापुर्वी तो पेसातून बाहेर आला असेल, व् त्याचे नाव बदली पात्र यादीत आले असल्यास बदली पात्र यादी घोषित झाल्यावर त्या शिक्षकाने आक्षेप घ्यावा.100% त्याचे नाव वगळले जाईल

16) प्रमोशन घेतले असले तरी ही जिल्हा हजर दिनांक धरणार आहेत
17)विनंती बदली करणे बंधनकारक नाही.

18)टप्पा क्र 1 साठी उदाहरण:---- जिल्ह्यात पेसा भरल्यानंतर 200 जागा रिक्त असल्यास त्या कोठे कोठे ठेवायच्या याचा अधिकार प्रशासनाचा आहे.
              मला असे वाटते 20 पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळेवर बदली पात्र शिक्षक असल्यास त्या जागा प्रशासन सक्तीने ठेवावयाच्या रिक्त जागा म्हणून घोषित करु शकते.
19)टप्पा क्र 4 मधील वाक्य क्र 5 नुसार त्यांची बदली फक्त सोप्या क्षेत्रात होऊ शकते.
अवघड मधून अवघड त केल्यावर पुन्हा ते पुढच्या वर्षी बदली मागु शकतात म्हणून वाक्य क्र 5 घातले आहे.

उदाहरण-----
समजा नगर जिल्ह्यात कार्यरत शिक्षक 10000 आहेत व बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र 7000 आहेत . तर सेवा ज्येष्ठता यादीतील अनुक्रमांकनुसार उपलब्ध असणाऱ्या पसंती साठी जागा खालीलप्रमाणे-------------
अ क्र               उपलब्ध जागा
1                     7000
2                     6999
3                     6998
1000               6000
2000               5000
3000               4000
5000               2000
6998                 3
6999                 2
7000                 1



20)व्याख्या || मधील 2 नुसार एकही बदली न करता पेसातील रिक्त जागा निरंक करून उर्वरित जिल्ह्यातील ठेवावयाच्या रिक्त जागा निश्चित केल्या जातील. व नंतर बदली प्रक्रियेला सुरुवात होईल.
21) पेसा भाग असलेला अवघड क्षेत्रातील जागा विनंतीने न भरल्यास सोप्या क्षेत्रातील जुनिअर्स वर अन्याय होऊ शकतो.त्यांना तेथे जावे लागेल.
  धन्यवाद

No comments:

Post a Comment