Wednesday, 26 April 2017

सरल स्टाफ अपडेट










जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व शिक्षकांसाठी सूचना -

शासन आदेशानुसार राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली ही staff portal मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे केली जाणार आहे.
२.
शिक्षकाची सर्व माहिती Staff Portal वर भरलेली असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी माहिती भरलेली असल्यास सदरची माहिती Update व केंद्रप्रमुख यांनी Verify केलेली असणे आवश्यक आहे. तरी शाळेने त्याप्रमाणे तपासून staff portal वर सर्व शिक्षकाची माहिती update करून संबंधित केंद्रप्रमुख यांच्याकडून verify करावी.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना माहिती भरण्यासाठी विभागनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
अ.क्रदिनांकलॉगीन उपलब्ध असलेले विभाग
दि.२५ एप्रिल २०१७ ते दि.०१ मे २०१७पुणे विभाग, कोल्हापूर विभाग, मुंबई विभाग
दि.०२ मे २०१७ ते दि.०७ मे २०१७नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, लातूर विभाग
दि.०८ मे २०१७ ते दि.१२ मे २०१७अमरावती विभाग, नागपूर विभाग
New Forms in Staff Portal for All Private Aided and Z.P.Schools -
१.
Map Teacher with Multi Medium - ज्या शाळेमध्ये अध्यापनाची बहू माध्यमे (Multi Medium School) आहेत त्या शाळांनी त्यांच्या शाळेतील शिक्षक कोणत्या माध्यमासाठी शिकवीत आहेत त्या सर्व शिक्षकांची माहिती Staff Portal वर select करणे compulsory आहे. अशा बहू माध्यमाच्या शाळांनी सदरची माहिती staff portal वर update करावी त्याशिवाय सदर शाळांतील अतिरिक्त शिक्षकांची नावे Staff Portal ला भरलेली नसल्यास समायोजन पोर्टलसाठी EO लॉगिन वर त्या शिक्षकाची नावे दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
२.
End of Service - एखादा शिक्षक staff portal वर माहिती भरल्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाला असेल किंवा अन्य कारणामुळे त्याची सेवा समाप्त (बडतर्फ/मयत/स्वेच्छा सेवानिवृत्ती/राजीनामा इ. कारण) झालेली असल्यास अशा शिक्षकांची नोंद शाळेने या form मध्ये करावयाची आहे. व ती केंद्रप्रमुख यांना Forward करून Verify करावयाची आहे.
३.
Detach/Attach of Teaching Staff - एखादा शिक्षक Staff Portal वर माहिती भरताना जुन्या शाळेत होता व तो शिक्षक आज रोजी बदलीने/पदोन्नतीने नवीन शाळेत रुजू झालेला आहे असा शिक्षक जुन्या शाळेने Detach करावयाचा आहे. सदर शिक्षक शाळेने Detach केल्यानंतर तो शिक्षक वरिष्ठ authority यांच्या लॉगिनवरून confirm करावयाचा आहे. त्यानंतर नवीन शाळेला असा शिक्षक Attach करण्यासाठी शाळेच्या लॉगिनवर उपलब्ध होईल. सदर शिक्षक शाळेने attach करावा. त्यानंतर पुन्हा नवीन शाळेच्या संबंधित वरिष्ठ authority कडून त्याला approve करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment