Monday, 6 November 2017

७ नोव्हेंबर’ विद्यार्थी दिवस विशेष


विद्यार्थी दिवस

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ‘७ नोव्हेंबर’ हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

उद्देश

या दिवशी १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या श्री छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (तेव्हाचे गव्हर्नमेंट हायस्कूल) पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला होता. त्या वेळी त्यांचे नाव भिवा असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या घटनेचे स्मरण म्हणून तसेच विद्यार्थ्यांना ‘शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असलेल्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी’ महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला.
अधिक माहिती साठी 

No comments:

Post a Comment