🕎चारोळ्या🕎
सत्य शोधा सत्य काढा
खाणी सत्याच्या खणुनी ।
या रे अज्ञाना बाहेर
ज्ञान घ्या रे उमजुनी ।।
आज म.जोतिराव फुले जयंती निमित्त..
त्यांना वंदन स्वरुपात ह्या चारोळ्या...
गेली सांगून पहा रे
माझ्या जोतिबाची वाणी।
सत्य शोधा आणि जगा
जगी माणूस म्हणूनी ।।
माझ्या जोतिबाची वाणी।
सत्य शोधा आणि जगा
जगी माणूस म्हणूनी ।।
🔸🔹🔸🔹
जोतिबाच्या जन्मदिनी
गारे जोतिबाची गाणी ।
सत्य शोधकाची सांगा
गाण्यामधून कहाणी ।।
गारे जोतिबाची गाणी ।
सत्य शोधकाची सांगा
गाण्यामधून कहाणी ।।
🔸🔹🔸🔹
खाणी सत्याच्या खणुनी ।
या रे अज्ञाना बाहेर
ज्ञान घ्या रे उमजुनी ।।
🔸🔹🔸🔹
जात मानव एकच
बाकी साऱ्या घातपाती।
शत्रू मानव जातीचा
ज्याने निर्मियल्या जाती।।
बाकी साऱ्या घातपाती।
शत्रू मानव जातीचा
ज्याने निर्मियल्या जाती।।
🔸🔹🔸🔹
धर्म मानवता एक
सत्यता ही त्याची निती ।
निती हिच सांगूनिया
गेले क्रांती आणि ज्योती ।।
सत्यता ही त्याची निती ।
निती हिच सांगूनिया
गेले क्रांती आणि ज्योती ।।

No comments:
Post a Comment